कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू
कंटेनरचे चाक डोक्यावरून व छातीवरून गेल्याने एका 36 वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.10) सकाळी चाकण येथे तळेगाव चाकण रोड वर घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 57 वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात हर्षल हेमलाल खडके (वय 36 रा. वाकी खेड) याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हर्षल हे रस्त्यावरून पायी जात होते. यावेळी कंटेनर आर जे 32 जीसी 8540 वरील चालकाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरच्या चाक हर्षल यांच्या डोक्यावरून व छातीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. यावेळी कंटेनरच्या लोकांनी त्यांना कोणतीही मदत न करता तो कंटेनर तेथे सोडून पळून गेला. चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.