Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हीही असे पायावर पाय ठेवून बसता का? क्रॉस लेग पोसिशन आहे खतरनाक

तुम्हीही असे पायावर पाय ठेवून बसता का? क्रॉस लेग पोसिशन आहे खतरनाक 


प्रत्येकाची बसण्याची पोज वेगवेगळी असते, काही सरळ बसतात, तर काहींना पायावर पाय क्रॉस करून बसण्याची सवय असते. घर असो वा ऑफिस, लोक आरामात बसण्यासाठी एक पाय दुसऱ्यावर ठेवून मोठ्या आनंदाने बसतात. पण जास्त वेळ असे क्रॉस लेग करून बसून राहिल्यास ते तुमच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का?


खरं तर, जेव्हा तुम्ही एक पाय दुसऱ्यावर ठेवून बसता, तेव्हा ते पेल्व्हिक एरियातील बोन अलाइनमेंटची समस्या वाढू शकते. यासोबतच ब्लड सर्क्युलेशनवरही परिणाम होतो. ज्या लोकांना पाय क्रॉस करून बसण्याची सवय आहे त्यांना अनेक छोट्या-मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, असं एका रिसर्चमध्ये आढळलं आहे. क्रॉस लेग पोश्चरचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, ते जाणून घेऊया.

क्रॉस लेग पोश्चरमध्ये बसल्याने होतात या समस्या

गरोदरपणात अडचणी

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, जर महिला गरोदरपणात क्रॉस-लेग पोश्चरमध्ये बसल्या तर त्यामुळे अनेक समस्या होतात. या काळात महिलांच्या शरीरात खूप लवकर बदल होतात. त्यामुळे मसल क्रॅम्प, पाठदुखी या समस्या सामान्य असतात. जर गरोदर स्त्री क्रॉस लेग करून बसली तर आईसोबत बाळाचंही नुकसान होतं. याचबरोबर लेग क्रॅम्प व सांधेदुखी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

हाय ब्‍लड प्रेशरची समस्‍या

तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं बीपी तपासलं जातं तेव्हा दोन्ही पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ब्लड फ्लो चांगला राहावा, यासाठी दोन्ही पाय जमिनीवर सारखेच ठेवणं चांगलं असतं असं मानलं जातं. पाय क्रॉस करून बसल्याने बीपी तात्पुरतं वाढू शकतं, असं एका संशोधनात आढळलं आहे.

व्हेरिकोज व्हेन्समध्ये समस्या

जेव्हा ब्‍लड व्हेन्समधून जाताना रक्त हृदयापर्यंत सहज पोहोचत नाही किंवा पंप मिळत असूनही ब्लड फ्लोमध्ये अडचणी येतात, तेव्हा व्हेन्समध्ये ब्लड बॅक फ्लो करू लागतं आणि व्हेरिकोज व्हेन्सची समस्या सुरू होते. यामध्ये शरीराच्या अनेक भागांतील नसा जांभळ्या रंगाच्या दिसू लागतात, ज्या प्रत्यक्षात रक्ताच्या गुठळ्या असतात. क्रॉस लेग करून बसल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पाय क्रॉस करून बसणं टाळायला हवं, जेणेकरून या समस्या उद्भवणार नाहीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.