Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' आधी कडकनाथवर बोला ', भर सभेत शेतकऱ्याचा सदाभाऊ खोतनां सवाल

' आधी कडकनाथवर बोला ', भर सभेत शेतकऱ्याचा सदाभाऊ खोतनां सवाल 


हातकणंगले लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होत आहे. यानिमीत्ताने मतदार संघात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. दरम्यान काल शिरोळ तालुक्यात प्रचार सभेवेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्यांने थेट कडकनाथ बद्दल प्रश्न विचारल्याने खळबळ उडाली. माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्मभूमी असणाऱ्या उदगाव येथे धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.


श्री. खोत यांचे भाषण सुरू असताना अचानक एक शेतकरी मोठ्या आवाजात खोत यांचे भाषण थांबवत म्हणाले 'आधी" 'कडकनाथ'चे बोला, शेतकऱ्यांचे पैसे परत द्या', "कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या,' असा थेट सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना उदगाव (ता. शिरोळ) येथे संदीप भंडारे या युवकाने विचारला.

यावर क्षणभर खोत यांची तारांबळ उडाली. मात्र त्यांनी ही विरोधकांची खेळी असल्याचे सांगत, 'आपणाला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ,' असे सांगत वेळ मारून नेली. या सभेतील हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.

कडकनाथ घोटाळ्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील ज्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे ती माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती संघटने'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित आहे असे आरोप झाले. पण सदाभाऊ खोत यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

"यामध्ये काही शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली. आम्ही हा उद्योग करू का, म्हणून आम्हाला कुणी विचारायला आलेलं नव्हतं. किंवा कोणी हा उद्योग केला त्यांनीही तो पाहायला आम्हाला कधी बोलावलं नाही. हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा आमच्या संघटनेच्या आणि त्या कंपनीच्या नावामध्ये आम्हाला साम्य आढळून आलं. त्या व्यक्तीनं अशा पाच सहा कंपन्या काढलेल्या होत्या.

आता एखाद्या नावात साम्य असेल आणि त्याची भागिदारीच त्यात आहे असं कोणी म्हणायला लागलं असेल, तर आमच्या नावात साम्य असलेल्या अनेकांन उद्योग उभे केले आहेत. त्यात आमची भागिदारी असली पाहिजे," सदाभाऊ खोत असे सदाभाऊ खोत यांचे म्हणणे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.