कुणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्यावर मुस्लिम समाज संजयकाकांनाच मतदान करणार : शेखर इनामदार
सांगली : कुणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्यावर मुस्लिम समाज संजयकाकानाच मतदान करणार आहे याची आम्हाला खात्री आहे. असे प्रतिपादन भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी केले. भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ जनसुराज्य शक्ती पार्टीच्या माध्यमातून सांगलीतील शामरावनगर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, युवा नेते प्रभाकरबाबा पाटील, ओंकार जाधव, अलीम पठाण, फारुख जमादार, सलीम पठाण, मिलिंद चींके, वैभव लाटवडे, रमजान मुल्ला, शाहरुख पठाण तौफिक दड्डी यांच्यासह महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
शेखर इनामदार म्हणाले, सहा वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवा. या शामराव नगरात आत यायला सुद्धा रस्ता नव्हता. आम्ही येऊन बघू लागलो अतिशय दयनीय अवस्था येथे होती. आम्ही खासदार संजयकाका आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून कामाचा धडाका लावला. लाईट, रस्ते केले. विविध विकास कामे करत विश्रामबाग सारखा हा भाग विकसित केला. भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी आहे, अल्पसंख्यांक विरोधी आहे असा अपप्रचार करत लोक तुम्हाला भेटतील. तरुणांच्या मध्ये विष पेरण्याचं काम करतील. अल्पसंख्यांक लोकसंख्या कमी असलेल्या प्रभागात सुद्धा भाजपाचे मुस्लिम नगरसेवक निवडून येतात म्हणजे हिंदू समाज तुमच्या विरोधात नाही. पण कॉंग्रेस तुमच्या विरोधात आहे.नेहमी आपण गुण्यागोविंदाने नांदतो. तुमच्या सणाला आम्ही तुमच्या कडे येतो. दिवाळीच्या सणाला तुम्ही आमच्या कडे येता. मग निवडणुकीच्या काळात का भेदभाव केला जातो. आज आम्हाला सांगतात किती काम केले तरी अल्पसंख्यांक भाजपा बरोबर येणार नाही. पण विकास कामांच्या बळावर आम्हाला खात्री आहे की मुस्लिम समाज हा शंभर टक्के संजयकाका पाटील यांना मतदान करणार. इतर भागातील सांगत नाही पण सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील मुस्लिम समाज हा ठामपणे आमच्या पाठीशी आहे. काही लोक विष पेरण्याचं काम करत आहेत. परंतु विकास कामांच्या जोरावर आपण मने जिंकण्यात यशस्वी झालो आहोत.
मुद्रा योजनेचं काम चांगले केले. पाच कोटी पैकी अडीच कोटी रुपये मुस्लिम समाजातील उद्योजकांना दिले. आवश्यक त्या सर्व सुविधा तुमच्या भाग दिल्या आहेत. संजयकाका हे तुम्हाला परिचित उमेदवार आहेत. तुमच्या सुख दुःखात येणारे आहेत. सर्व सामान्य माणसांत मिसळून राहणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. मुस्लिम बांधवांचे संजयकाका यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तुम्ही हे जाणलं पाहिजे. कोणीतरी येतो आणि चार दिवसांत मोबाईल वर पोस्ट टाकून तुम्हाला भडकतो. जनसुराज्य शक्ती पार्टी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. शामराव नगरात दफन भूमीचा प्रश्न आम्ही सोडविला. पण विरोध करणारे कोण होते तुम्हाला माहिती आहेत. आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम महायुतीने केलं आहे. महायुतीचं सरकार हे संयमाचं सरकार आहे. विकास कामे समोर ठेवून अल्पसंख्यांक समाजात निश्चितपणे महायुती आणि संजयकाकांच्या बरोबर आहे. यांची आम्हाला खात्री आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.