Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पुण्यातील एका कॅफेमध्ये नको त्या अवस्थेत तरुण - तरुणी आढळून आली

धक्कादायक! पुण्यातील एका कॅफेमध्ये नको त्या अवस्थेत तरुण - तरुणी आढळून आली  


पुण्यातील राजगुरूनगर शहरामधील एका कॅफेमध्ये पोलिसांना कॉलेजच्या तरूण-तरूणी नको अशा अवस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांना लॉज आणि कॅफेमध्ये छापे मारताना हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना कॉलेजमधील तरूण-तरूणी अश्लिल प्रकार करणारी जोडपी आढळुन आली. यामधील धक्कादायक गोष्ट म्हणजे कॅफेच्या नावाखाली अंधार करुन महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा हा अश्लिल प्रकार सुरू होता.

लॉजमध्ये गेल्यावर ओळखपत्र दाखवावे लागत असल्यामुळे आता ही जोडपी कॅफेकडे वळली आहेत. काहींनी हाच व्यवसाय सुरू केला आहे. तिथे कॅफेच्या नावाखाली तरूण तरूणींना प्रवेश दिला जातो. प्रत्येक जोडप्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येते. ओळखपत्र न दाखवता प्रवेश मिळत असल्याने जोडपी जास्तीचे पैसे देण्याची तयारी दर्शवतात. पण कॅफे चालकांना कारवाईची भीती का नाही? कॅफे चालवण्यासाठी दुसऱ्या कोणाचे खिसे गरम केले जात नाहीत ना? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.