लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. एकीकडे महायुती आणि दुसरकीडे महाविकास आघाडी अशी चुरस महाराष्ट्रात या लोकसभेच्या निवडणुकीत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड-शो होणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. २० मे रोजी कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार सरू आहे. महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात कंबर कसली आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.