पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये धक्कादायक घटना, मैत्रीणीचें अश्लील व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची
सध्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत माहिती अशी की, विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ आरोपी तरुणी आपल्या मित्रांना पाठवत होती. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रशासन हादरले आहे. पुणे शहरात म्हणजेच विद्येच्या माहेरघरात ही घटना घडल्याने याबाबत चर्चा सुरू आहे.
याबाबत आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आर्या हिने हॉस्टेलमध्ये चोरून विद्यार्थीनींचे व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. यानंतर हे दोघे सोशल मीडियावर या विद्यार्थीनींचे व्हिडिओ टाकत होते.
याप्रकरणी आर्या आणि विनीत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीईओपी कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे कमी कपड्यातले, कपडे बदलतानाचे व्हिडीओ आर्या शूट करायची. तसेच ती हे विडिओ इतर अनेक ठिकाणी पाठवायची.तसेच व्हिडीओ मित्र विनीतला पाठवत असे. या प्रकरणी सीईओपी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्या गिरीश काळे या विद्यार्थिनीला निलंबीत करण्यात आल्याचे सीईओपी कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हे व्हिडिओ इतर ठिकाणी कुठे पाठवले आहेत का? याबाबत चौकशी सुरू आहे. या घटनेने मात्र त्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी राहत असलेल्या मुली याबाबत वेगवेगळ्या चर्चा करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.