Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करावी? जाणून घ्या

अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करावी? जाणून घ्या 


जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख आहे. हिंदू धर्मात काही नियम आणि परंपरा आहेत, ज्याला वैज्ञानिक आधार देखील आहे. असाच एक नियम अंत्यसंस्काराशी संबंधीत आहे. हा नियम म्हणजे अंत्यसंस्कार केल्यानंतर स्नान करणे. हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्मापासून ते मत्यूपर्यंत एकूण 16 संस्कार केले जातात. 

त्यापैकी शेवटचा संस्कर म्हणजे अंत्यसंस्कार. हिंदू धर्मात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात ज्या प्रमाणे नियम आहे. त्याच प्रमाणे अंत्यसंस्काराला जाणाऱ्यांसाठी देखील काही नियम आहे. या नियमांतर्गत अंत्यसंस्कार करुन परतल्यानंतर स्नान करणे हिंदू धर्मात बंधनकार आहे. आजचा आपला हा लेख त्याच विषयावर असून या लेखात आपण अंत्यसंस्कारानंतर स्नान करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे? जाणून घेणार आहोत. 


या जगात मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर, मयताला अंत्ययात्रा काढून शेवटचा निरोप दिला जातो. अंत्ययात्रेत मयताचे प्रियजन सहभागी होत ते संपुर्ण विधी पार पाडतात. यासह अंत्ययात्रेत सहभागी होऊन आणि अंत्यसंस्काराच्या प्रसंगी उपस्थित राहिल्यास, व्यक्तीला जीवनाचे सत्य कळते आणि स्मशानभूमीत जाण्याचे आध्यात्मिक फायदे देखील आहेत. मात्र, अत्यसंस्कारानंतर आंघोळ केली पाहिजे. कारण या मागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. 

हे आहे धार्मिक कारण

स्मशानभूमीत मृतदेहांचे सतत अंत्यसंस्कार होत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची नकारात्मक उर्जा निर्माण होते. ही नकारात्मक शक्ती कमकुवत मनोबल असलेल्या व्यक्तीला हानी पोहोचते. त्यात महिलांना याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे हिंदू धर्मात महिलांना स्मशानभूमीत प्रवेश नाकारला जातो. शास्त्रानुसार, अंत्यसंस्कारानंतरही मृत आत्म्याचे सूक्ष्म शरीर काही काळ तेथेच असते, ज्याचा काही नकारात्मक प्रभाव देखील होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत अंत्यसंस्काराहून परतल्यावर स्नान केलं पाहिजे, असे शास्त्रात म्हटले आहे. 

यासह जळत्या चितेसमोर उभे राहिल्यास व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा वितळते, हे फक्त स्मशानभूमीतच शक्य आहे. कारण, मान्यतेनुसार, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मंगळ आणि शनिची भरपूर ऊर्जा असते, ज्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक उर्जा वितळते. या सर्व बाबी लक्षात घेता प्राचीन काळी ऋषी-मुनींनी स्मशानभूमीत विहीरी बांधल्या होत्या. या ठिकाणी अंत्यसंस्कार झाल्यावर प्रत्येकजण स्नान करून नकारात्मक शक्तिपासून मुक्त होत होते.

असं आहे वैज्ञानिक कारण
अंत्यसंस्कारानंतर स्नान करणे वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. कारण, स्मशानभूमीतील वातावरणात सूक्ष्म आणि संसर्गजन्य रेणू आणि जंतूंचा संसर्ग होतो. याशिवाय, मृत व्यक्तीला देखील काही संसर्गजन्य रोग झाला असल्यास त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. आंघोळ केल्यावर संसर्गजन्य जंतू पाण्यासोबत धुतले जातात. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर स्नान केले पाहिजे.

(टीप - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. ' सांगली दर्पण 'या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.