Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपाचे मतदार नाराज झाले :, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपाचे मतदार नाराज झाले :, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट 


शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. "अजित पवार यांच्या महायुती देण्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला होता" असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मराठी आणि मुस्लीम मतांचा मुंबईच्या जागांवर किती प्रभाव होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, "अजित पवार महायुतीत आले तेव्हा आमचा मतदार नाराज झाला होता. परंतु अजित पवारांच्या वर्तनाने महायुतीचा अवमान होणार नाही याची त्यांना खात्री पटली. याचा तुम्हाला बारामतीच्या निकालात प्रत्यय येईल आणि खडकवासला येथील भाजप मतदार कोणाला मतदान करतात यावरुन समजेल"

शरद पवारांवर टीका

त्याचबरोबर, "शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यामुळे त्यांचे पक्ष फुटले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्यामुळे अजित पवारांना व्हिलन करण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होते. आता मराठी मतदार हा शिवसेनेबरोबर आहे ही फक्त अफवा आहे" असे वक्तव्यं देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, या मुलाखती देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, "आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, परंतु 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा तुमची असली तरी आम्ही ती सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली"

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.