Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक

दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक

मुंबई: स्वतःच्या फायद्यासाठी आई-वडिलांनीच आपल्या हसनैन या दीड वर्षाच्या बाळाला एका गे जोडप्याला विकल्याची घटना घडली. याप्रकरणी डीएननगर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. त्यात एका तृतीयपंथीयाचाही समावेश असून, बाळाची सुखरूप सुटका करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. नजमीन शेख (बाळाची आई), तिचा पती मोहम्मद आझाद शेख उर्फ बादशाह, एजंट सकीनाबांनो शेख, राबिया परवीन अन्सारी, सायबा अन्सारी आणि इंद्रदीप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नजमिनने डी एन नगर पोलिस ठाण्यात तिच्या बाळाची विक्री झाल्याची तक्रार दिली. तिच्या म्हणण्यानुसार, शेजारीन असलेल्या सकिनाने तिचा साहेब चित्रपट क्षेत्रात हसनैनला काम मिळवून देईल. त्या बदल्यात दिवसाचे तुम्हाला २ ते ३ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. ती भेटायला गेल्यावर सायरबाने माझ्या मुलाला घेत मला १० हजार रुपये दिले. मात्र काही दिवस होऊनही त्यांनी मुलाला परत आणले नसल्याने मी त्यांना जाब विचारला. 

त्यावर त्यांनी पुन्हा काही रक्कम माझ्या हातावर ठेवत तुमचा मुलगा तुम्हाला मिळणार नाही, आम्ही त्याला विकले आहे, असे सांगितले. नजमिनच्या तक्रारीवरून, परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंदर मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देसले, सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार, उपनिरीक्षक सीमा खान, कॉन्स्टेबल स्मिता पेडणेकर, हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार, कॉन्स्टेबल वारे, लाडे या पथकाने तपास सुरू केला. तपासात ते पनवेलमध्ये मेहरवालपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले.

सायबानेच आम्हाला बाळ विकले!

मेहरवालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सायबाने त्यांना ४.६५ लाखांना हसनैनला विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपीकडे चौकशी केली. तेव्हा मुलाचे आई-वडील नजमीन आणि आझाद यांनीच सायबा, राबिया व सकिना या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने नजमीनने पोलिस ठाण्यात धाव घेतली असे तिचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.