मराठीतील तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटेने नुकत्यान तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रणितने म्हटले आहे की, एका हॉटेलमध्ये बुकिंग मिळाले होते. पण तृतीयपंथी असल्याने बुकिंग रद्द केले.
प्रणित हाटेची सोशल मीडियावरील पोस्ट
प्रणित हाटने लिहिले आहे की, मी एका शो साठी नाशिकला आली होती. यासाठी एका हॉटेलचे बुकिंगही केले होते. पण तृतीयपंथी असल्याने हॉटेलचे बुकिंग रद्द केले. याशिवाय प्रणितने राग व्यक्त करत पुढे म्हटले की, आम्ही कुठे जायचे?. यावर प्रणितच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिलाय. एका चाहत्याने म्हटले की, या संदर्भात तक्रार दाखल करावी.
कोण आहे प्रणित हाटे?
प्रणित हाटे मराठी अभिनेत्री आहे. प्रणितने ''युवा डान्सिंग क्विन'' कार्यक्रमाच्या माध्यमातून गंगा म्हणून घरोघरी पोहोचली. याशिवाय प्रणित हाटेला नवाजुद्दीन सिद्दीकीचा सिनेमा 'हड्डी'मध्ये ही काम करण्याची संधी मिळाली होती. सिनेमातील भूमिकेसाठी प्रणितचे खूप कौतुकही करण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.