Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटीलांची संधी कोणामुळे हुकली? जयंत पाटील स्पष्टच बोलले

विशाल पाटीलांची संधी कोणामुळे हुकली? जयंत पाटील स्पष्टच बोलले 


महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची उपस्थिती आहे.

या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मविआचे वातावरण उत्तम आहे. उद्धव ठाकरे शरद पवार हातात हात घालून काम करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दहा उमेदवार उभे केले आहेत. तिथे शिवसेना आणि काँग्रेस मदत करत आहे. दहा पैकी दहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे. आघाडी एकत्र असली की काहीही होऊ शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जयंत पाटील यांच्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांची लोकसभेच्या उमेदवारीची संधी हुकली, जयंत पाटील यांच्यामुळेच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली अशी चर्चा सुरू आहे. यावर आता जयंत पाटील पहिल्यांदाच बोलले आहेत. मी आणि आर आर पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेला संधी दिली. चंद्रहार पाटील जिल्हा परिषदेत दहा मतांनी निवडून आले. पण लोकसभेला उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, मात्र मीच उमेदवारी द्यायला लावली अशी चर्चा सुरू असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग झाला आहे. असं मला वाटतं कारण माझ्या घराण्यात कोणीही आमदार खासदार नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली त्यांचे मी आभार मानतो. आपलं दुर्दैव आहे की घटक पक्षातल्या लोकांनी बंडखोरी केली आहे. पण खरी चूरस भाजपच्या उमेदवाराबरोबर आहे. तुमची उमेदवारी ही तुमच्या संस्था आणि तुमचं घर वाचवण्यासाठी आहे. मात्र माझी उमेदवारी जनतेसाठी आहे. असा टोला यावेळी चंद्रहार पाटील यांनी लगावला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.