कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे पुढे येत आहे. 'ससून'मध्ये अल्पवयीन आरोपीचे ब्लड स्मॅपल बदलण्यात आले. त्यामुळे दोन डाॅक्टरांचे तर एक कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. 'ससून'चे डीन विनायक काळे यांनी या प्रकरणात दोषी डाॅ.अजय तावरे याची नियुक्ती मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रामुळे केली असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांत विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काळे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीमधील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे देण्यात आला.
आज (गुरुवारी) डॉ. म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला. तसेच त्यांनी 'ससून'च्या डॉक्टरांबरोबर हॉस्पिटल मधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. तसेच सर्वांना नियमा प्रमाणे काम करण्याची ताकीद त्यांनी दिली आहे. हिट अँड रन प्रकरणात जे घडले त्या विषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.
डॉ. काळे सक्तीच्या रजेवर
ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी बुधवारी (ता.29) पत्रकार परिषद घेतली होती . ससून चौकशी समितीने केलेल्या चौकशी संदर्भात माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली होती. डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. डॉ. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र तावरे यांच्या नियुक्तीवर त्यांनी केलेल्या भाष्यानंतर काही तासांतच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होतआव्हानांचा डोंगर'ससून'ची प्रतिमा मागील काही काळामध्ये घडलेल्या प्रकरणांमुळे मलिन झाली आहे. रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले. त्यानंतर ड्रग्ज तस्करीचा आरोपी देखील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर आता हिट अँड रन प्रकरणात ससूनमधील दोन डाॅक्टरांसह एक कर्मचारी निलंबित झाला आहे. त्यामुळे 'ससून'ची प्रतिमा पु्न्हा उंचावण्याच्या आव्हान डाॅ. मस्केंच्या समोर असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.