तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम १७१ सी, १८६, ५०५(१)(सी) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ अन्वये मलकपेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आली.
माधवी लता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या मतदान केंद्राला भेट देत असताना मुस्लिम महिलांची ओळखपत्रे तपासताना दिसल्या. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की,’भाजप उमेदवार माधवी लता मतदान केंद्राच्या आत मुस्लिम महिलांना बुरखा काढण्यास सांगत आहेत आणि त्यांची ओळखपत्रे तपासताना दिसत आहेत. एवढेच नाही तर मतदार महिलांना त्यांची ओळख सागा असेही विचारत आहे. मात्र या प्रकरणाबाबत भाजप उमेदवार माधवी लता म्हणतात की,’त्यांनी मुस्लिम महिलांना त्यांची ओळख पडताळून पाहण्याची विनंती केली होती आणि तसे करणे चुकीचे नाही’ असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’मी निवडणूक उमेदवार आहे आणि कायदेशीररित्या उमेदवाराला फेस मास्कशिवाय मतदारांचे ओळखपत्र तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी पुरुष नाही, मी एक महिला आहे आणि मी त्या महिलांना त्यांची ओळख उघड करण्याची नम्र विनंती केली होती. मी तुमचे ओळखपत्र पाहू शकते का? असेही मी विचारले होते. माधवी लता म्हणाल्या आहे.यापूर्वी माधवी लता यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत तफावत असल्याचा आरोप केला होता. माधवी लता म्हणाल्या की पोलीस कर्मचारी खूप सुस्त दिसत आहे, ते सक्रिय नाहीत… ते तपास करत नाहीत. याठिकाणी ज्येष्ठ नागरिक मतदार येत असले तरी त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.