किल्लेमच्छिंद्रगड: भारतातील आणीबाणीचा काळ हा २५ जून १९७५ ते १९७७ असा २१ महिन्यांचा कालावधी होता. आणिबाणी मागे घेतल्यानंतर राज्यात १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा काँग्रेस विरुद्ध सारे पक्ष एकत्र येवून पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना झाली होती.
अपेक्षेप्रमाणे "पुलोआ'ने सत्ता मिळविण्यात यश मिळविले. त्यावेळचे राजकीय कार्यकर्तेही तात्विक विचाराचे होते. सर्वांच्या सभेसाठी गावात एकच व्यासपीठ असायचे आणि त्या व्यासपीठावर काँग्रेस, शे. का. प आणि पुलोआच्या नेत्यांच्या सभा व्हायच्या. निवडणूक संपेपर्यंत व्यासपीठ तसेच असायचे.
निवडणूक झाल्यानंतर जनता पक्षाचे लोकनेते राजामराबापू पाटील हे सहकार मंत्री झाले तर विधान परिषदेवर निवडून येऊन प्रा. एन. डी. पाटील हे शिक्षणमंत्री झाले. त्यावेळीं वाळवा तालुक्यात तीन आमदार झाले होते, त्यापैकी दोन मंत्री आणि निवडून येवूनही विलासराव शिंदे हे आमदार राहिले होते. आज तिन्ही नेते आपल्यात नाहीत.तथापि पूर्वीचे नेते आणि कार्यकर्ते तात्विक विचारसरणीचे होते. एकाच व्यासपीठावर सभा घेणारे आणि मतदारही तितकेच समंजस होते सर्वांच्या सभा ऐकण्याची मानसिकता ठेवणारे. नाहीतर आजकालच्या राजकारणातील नेते, कार्यकर्ते आणि मतदार हे संधीसाधू झालेत. व्यासपीठावरच कुस्त्या खेळणारे आणि गुलाल तिकडे चांगभले करणारे..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.