सांगली लोकसभेत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार संजय राऊत, रोहित आर.आर. पाटील, सुमनताई पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी भाषणामध्ये बोलताना शरद पवार यांनी स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी आबांच्या राजकीय एन्ट्रीचा खास किस्साही सांगितला.
काय म्हणाले शरद पवार?
"आर आर आबा म्हणजे सर्व सामान्यातील कुटुंबातील व्यक्ती, प्रामणिक काम करण्याची वृत्ती. मला आठवतयं एक दिवस सांगलीला आलो होतो. तिथे विद्यार्थ्यांची एक सभा होती. या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण उभे राहिले. या तरुणांमध्ये एक तरुण बोलायला उभा राहिला. त्याने अतिशय चांगलं भाषण केले. मी चौकशी केली. भारी गडी दिसतोय, लक्ष ठेवलं पाहिजे. ते दुसरे कोणी नव्हते, आर आर पाटील होते," असं शरद पवार म्हणाले.तसेच "नंतरच्या काळात पक्षसंघटनेत आले. जिल्हा परिषदेत गेले. सांगलीची जिल्हा परिषद त्यांनी गाजवली. त्यानंतर त्यांना सांगलीच्या लोकांनी, तासगावच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आणि महाराष्ट्राला एक कर्तुत्ववान लोकांचे प्रश्न जाणणारा नेता मिळाला. सांगलीने कर्तृत्ववान माणस दिली. एक आर आर पाटील आणि दुसरे जयंत पाटील. आज रोहित पाटील आर आर पाटील यांचा वारसा चालवत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे," असे शरद पवार म्हणाले.
मोदींवर टीकास्त्र..
"देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचार धारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वतंत्र चळवळशी देणे घेणे नाही, त्यांचा हातात देशाची सूत्र आहेत. त्यांचे नाव नरेंद्र मोदी आहे. टीका करणारे लोक देशाच्या स्वतंत्र चळवळीत नव्हते," असा टोला यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.