बिहार : भागलपूरच्या जोगसरच्या दिव्य धाम अपार्टमेंटमध्ये २७ एप्रिल रोजी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अभिनेत्रीने आत्महत्या केली होती हत्या याचं कोडं आज उलगडलंय. २७ एप्रिल रोजी अमृताचा संशयास्पद मृतवस्थेत प्लॅटमध्ये आढळून आला होता.
अभिनेत्री अमृता पांडेने 'दो नाव पर सवार थी उसकी जिंदगी, हमने अपनी नाव को डुबाकर उसके सफर को आसान कर दिया', असं व्हॉट्स अप स्टेट्स तिने मृत्यूपूर्वी तिने ठेवलं होतं. अमृताचं स्टेट्स आणि संशयास्पद आढळलेला मृतदेह यावरून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. परंतु तिने आत्महत्या केली असावी असंही पोलिसांनी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे अमृताने आत्महत्या केली होती की, हत्या हे कोडं निर्माण झालं होतं. आज अमृताचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात धक्कादायक बाब समोर आलीय. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार अमृताची गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय.
भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा मृतदेह २७ एप्रिलच्या संध्याकाळी दिव्या धाम अपार्टमेंटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. हे अपार्टममेंट भागलपूरच्या जोगसर पोलीस स्टेशन हद्दीत आहे. आज अभिनेत्री अमृताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. या रिपोर्टमुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभे राहिले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अमृताचा गळा दाबून खून करण्यात आला होता.तर एफएसएल अहवालानुसार अमृताने आत्महत्या केली असल्याचं म्हटलंय. एफएसएल टीमच्या अहवालानुसार अमृताने आत्महत्या केली होती. आता या दोन्ही अहवालांच्या वेगवेगळ्या अनुमानामुळे अमृता पांडे मृत्यूचं गूढ अजून उकललेले नाहीये. एफएसएल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेत. दोन्ही अहवालात विरोधाभास आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्सच्या एचओडीकडून एक पॅनेल तयार करण्याची विनंती करण्यात आलीय. पोलीसही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत, असं भागलपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आनंद कुमार याप्रकरणी म्हणालेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.