Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाला करावा लागतोय शेतकऱ्यांच्या रोषचा सामना :, पंजाब - हरियाणात होतोय प्रचंड विरोध

भाजपाला करावा लागतोय शेतकऱ्यांच्या रोषचा सामना :, पंजाब - हरियाणात होतोय प्रचंड विरोध 


चंदीगढ:  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंजाब आणि हरियाणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागतो आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी टीका केली आहे. केवळ भाजपच्या विरोधात निदर्शने का केली जात आहेत, आम आदमी पार्टी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा विरोध का केला जात नाही असा प्रश्‍न जाखड यांनी विचारला आहे.


आम आदमी पक्षाच्या घोषणापत्राचा उल्लेख करताना जाखड म्हणाले मला शेतकरी युनियनच्या नेत्यांना एक प्रश्‍न विचारायचा आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यावर प्रति एकर २० हजार रूपये नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्‍वासन आपने त्यांच्या घोषणापत्रात दिले होते.
गेल्या वर्षी पुरामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. तेंव्हा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भरपाई देण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी काही दिले का? उलट केंद्र सरकारकडून ६८०० रूपये प्रति एकर दिले गेले. यांचे २० हजार रूपये कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या संघटनेचा एकही नेता आपला किंवा मुख्यमंत्र्यांना एकही प्रश्‍न विचारताना दिसत नाही.

मध्य प्रदेश आणि राजस्थानसारखी राज्ये गव्हाला एमएसपीच्या वर प्रति क्विंटल १२५ रूपये बोनस देत आहेत. पंजाब सरकारकडून असा कोणता बोनस दिला गेला नाही.तरीही त्यांना कोणी प्रश्‍न विचारत नाही. ते कोण विचारणार? शेतकरी संकटात आहेत व त्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदतीची गरज आहे.
मात्र प्रश्‍न नेतृत्वाचा आहे. शंभू रेल्वेस्थानकावर शेतकरी रूळांवर बसले असल्यामुळे रोज ६९ गाड्या रद्द केल्या जात आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवर योग्य तोडगा काढला पाहिजे आणि त्यासाठी नेत्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या युवकांच्या हत्यांचे प्रकार सहन करू शकत नाही. आमच्या व्यापाऱ्यांचे नुकसान सहन करू शकत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.