Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' छोटा भाईजाण ' अब्दुने साखरपुडा केला, त्यानं होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, कारण.......

' छोटा भाईजाण ' अब्दुने साखरपुडा केला, त्यानं होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, कारण.......


बिग बॉस 16 मधून घराघरात लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे अब्दू रोझिक. अब्दूने त्याच्या खास शैलीत सर्वांचं मन जिंकलं. ताझाकिस्तानात गायक म्हणून लोकप्रिय असलेल्या अब्दूने भारतात सुद्धा अमाप लोकप्रियता मिळवली. अब्दूने काहीच दिवसांपुर्वी व्हिडीओच्या माध्यमातून तो लवकर लग्न करणार असं जाहीर केलं होतं. अखेर काल १० मेला अब्दूने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन फॅन्सना खुशखबर दिली.

अब्दूने साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलेत. यात पाहायला मिळतं की अब्दू खास पोशाखात दिसतोय. तर त्याची होणारी बायको व्हाईड गाऊनमध्ये पाहायला मिळतेय. अब्दूने तिच्या बोटात अंगठी घातली. २४ एप्रिललाच अब्दूने साखरपुडा केल्याचं त्याने सांगितलं. अब्दूने हे फोटो पोस्ट करताना होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला. अब्दूला सर्वांनी कमेंटमध्ये अभिनंदन केलं.

अब्दूची होणारी बायको नेमकी कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार अब्दूची होणारी बायको दुबईमधील शारजा येथे राहत असून तिचं नाव अमीरा आहे. अब्दू आणि अमीरा यांनी शारजामध्येच एप्रिलमध्ये साखरपुडा केला. अमीरासोबत अब्दू ७ जुलैला लग्न करणार असल्याचं समजतंय. UAE मध्येच हे दोघे लग्नाचा बार उडवणार आहेत. अब्दूच्या लग्नाला बिग बॉसमधील त्याचे मित्र शिव ठाकरे, निम्रत कौर, साजीद खान जाण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.