अनेक लोकांना मद्यपान करण्याची मोठ्या प्रमाणावर सवय असते. त्यातल्या त्यात बियर आणि वाईन देखील आता मोठ्या प्रमाणावर पिली जाते व यामध्ये बियर पिणे म्हणजेच एक फॅशन या पद्धतीचा आव आणला जातो. तसेच बियरमध्ये अल्कोहोल कमी असते किंवा अल्कोहोल नसते हा एक मोठा समज असल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग बियर पिताना आपल्याला दिसून येतो.
काही व्यक्ती दररोज बियर पिता तर काहीच व्यक्ती कधीतरी बियरचा घोट घेतात. परंतु जे व्यक्ती दररोज बियर पितात त्यांनी मात्र खूप काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज बियर पिणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
बऱ्याच व्यक्तींना बियर पिण्याचे व्यसन जडते व दररोज बियर पिण्याशिवाय त्यांना होत नाही. परंतु जर अशी दररोज बियर पिण्याची सवय असेल तर मात्र त्यांना होणाऱ्या गंभीर नुकसानीची जाण असणे देखील तितकेच गरजेचे आहे.
दररोजबियरपीतअसालतरहोऊशकतेनुकसान
1 - वजनातहोतेवेगातवाढ – जर आपण बियरचा विचार केला तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण असते व अशावेळी दररोज बियर सेवन करत असाल तर मात्र मोठ्या प्रमाणावर कॅलरीज शरीरामध्ये पोहोचतात. त्यामुळे साहजिकच शरीरात कार्बोहायड्रेट वाढायला मदत होते व वजन वाढू शकते. दुसरे म्हणजे बिअर प्यायल्यामुळे भूक वाढते आणि ते वजन वाढण्यासाठी हानिकारक ठरू शकते.
2 - लिव्हरसाठीनुकसानदायक – बियर पिल्यामुळे लिव्हरला देखील नुकसान होऊ शकते. जास्त काळ दारू पिल्याने जसे लिव्हरचे नुकसान होते अगदी त्याच पद्धतीने जास्त कालावधी करिता बियर पिल्याने देखील लिव्हरला सूज येणे तसेच फॅटी लीवर, लिव्हर सोरायसिस यासारखी गंभीर आजार होऊ शकतात व यामुळे लिव्हरचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.3 - कॅन्सरचीशक्यता – एनसीआई अर्थात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बऱ्याचदा सांगण्यात आले आहे की,अल्कोहोल आणि बियरमुळे देखील कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे तोंड तसेच लिव्हर, स्तन आणि घशाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. एका अभ्यासामध्ये असे म्हटले होते की, मद्यपान जास्त केल्याने पाचन तंत्राचा म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढते.4 - हृदयरोगाचीशक्यता – काही अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, अल्कोहोलचे जास्त सेवन केले तर हृदयाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात व अशा परिस्थितीत बिअर जास्त प्रमाणात घेत असणाऱ्या व्यक्तीला त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाब तसेच ट्रायग्लिसराईड वाढू शकते. तसेच हृदयाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
5 - मॅग्नेशियम, विटामिनबीचीकमतरता – बियर आणि वाईन पिल्यामुळे शरीरातील आणि पोषक तत्वे नष्ट होण्याची शक्यता असते व त्यामुळे शरीरातील विटामिन बी आणि मॅग्नेशियमचे प्रमाण घटते. एवढेच नाही तर फॉलिक ऍसिड आणि झिंक देखील नष्ट होण्याची शक्यता असते व ते आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.