माजी मुख्यमंत्राच्या नातवासोबत सारा अली खान डेट करतीय ' ते ' फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर सारा अली खान हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे साराचे चित्रपट चांगलीच धमाल देखील करत आहेत. सारा अली खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सारा अली खान दिसते. मध्यंतरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या.
आता थेट सारा अली खान ही वीर पहाडिया याला डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीर कुमार शिंदे यांचा नातू आहे आणि शिखर पहाडिया याचा भाऊ. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे एकमेकांना डेट करत आहेत, मात्र, त्यांनी त्यांचे रिलेशन अजून ऑफिशियल केले नाहीये.
म्हणजेच काय तर जान्हवी कपूर आणि सारा अली खान या सख्या दोन भावांना डेट करत आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. हेच नाही तर शिखर पहाडिया याच्या नावाचे एक पेंडेट देखील जान्हवी कपूरने गळ्यात घातले आहे. जान्हवी कपूर आणि सारा अली खान हा चांगल्या मैत्रिणी देखील आहेत.सारा अली खान आणि वीर पहाडिया हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहेत. आता सारा अली खान हिच्या लंडन व्हेकेशनचे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया हे दिसत आहेत. हेच नाही तर अनंत अंबानी याच्या प्री वेटिंग फंक्शनमध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया हे धमाल करताना दिसले.
अनंत आणि राधिकाच्या प्री वेटिंगमध्ये सारा अली खान आणि वीर पहाडिया यांनी डान्स देखील केला होता. मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे लवकरच लग्न होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिरूपती बालाजी मंदिरात देखील जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकसोबत पोहचले होते. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.