Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस अधिका ऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन.. बसला धक्का

पोलीस अधिका ऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन.. बसला धक्का 


नवी दिल्ली : एका पोलिस अधिकाऱ्याने कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर भिकारी समजून एकाला पाणी प्यायला दिले. मात्र, चौकशी केल्यानंतर सत्य घटना ऐकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला धक्काच बसला. कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर एक तहानलेला व्यक्ती स्टेशनवर बसला होता. आरपीएफ पोलिस निरीक्षकाने त्याला पाहिलं आणि त्याला भिकारी समजून पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन झाल्यावर भिकाऱ्यानं इंग्रजीमध्ये आभार मानले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने त्याची चौकशी करायला सुरवात केली. भिकारी समजत असलेल्या व्यक्तीने सांगितलं, महावीर सिंह, दिवंगताचा मुलगा तो मुलगा आहे. तो समायन, पोलीस स्टेशन विधुना, जिल्हा औरैया (उत्तर प्रदेश) या गावचा रहिवासी आहे. 2 वर्षांपूर्वी 26 जून 2022 रोजी तो घरातून ATM पैसे काढण्यासाठी बिधुना येथे गेला होता. तो बिधुना येथे पोहोचला तेव्हा तेथील सर्व एटीएम मशीन बंद होत्या. त्यानंतर त्याने मित्र महेंद्रचे दुकान गाठून त्याच्या आधारकार्डवरून पैसे काढले.


हरिचंदापूर येथे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना त्यांच्याजवळ एक चारचाकी गाडी थांबली. गाडीतून एका व्यक्तीने उतरुन त्याच्या तोंडाला रुमाल बांधला. रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. शुद्धी आली तेव्हा तो बाथरूममध्ये बंद होता आणि तिथे खूप अंधार होता. त्या गाडीतल्या लोकांनी त्याला मारहाण करुन एटीएम आणि पैसे काढून घेतले. एटीएम पिन जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला मजूराचं काम करायला लावलं. सकाळी घेऊन जायचे खूप काम करवून घ्यायचे आणि मग परत संध्याकाळी सोडायचे. दोन वर्ष त्यांनी कैद करुन ठेवलं. तेथून कसातरी सुटलो आणि भुकेला तहानलेला सगळीकडे फिरलो. तेथून स्टेशनला पोहचल्याचे त्याने सांगितल्यावर पोलिस अधिकाऱ्याला धक्का बसला. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्याने त्याला घरचा नंबर विचारला आणि घरच्यांशी बोलणं करुन दिले. घरचेही त्याला पाहून खूप आनंदी होते. या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.