सुषमा अंधारेंना यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रश अंधारे आणि पायलट सुखरूप
महाडमध्ये हेलीकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलीकॉप्टरने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे प्रवास करणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच या हेलीकॉप्टरचा अपघात झाला. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला म्हणून हेलीकॉप्टर महाड येथे आले होते. मोकळ्या जागेत हेलीकॉप्टर उतरत असताना हे हेलीकॉप्टर अपघातग्रस्त झाले आहे. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी ९.३० वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणर होत्या. बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले असून महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.