Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजस्थान मध्ये ' काँग्रेसला भाजप पेक्षा जास्त जागा मिळतील ', सचिन पायलट

राजस्थान मध्ये ' काँग्रेसला भाजप पेक्षा जास्त जागा मिळतील ', सचिन पायलट 


लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतदानाचे तीन टप्पे नुकतेच पार पडले. पहिल्या दोन टप्प्यात राजस्थानमधील सर्व 25 लोकसभा जागांवर मतदान पार पडले. अशात आता राजस्थानमधील प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे लक्ष इतर राज्यांकडे लागले आहे.

दरम्यान, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे मोठे वक्तव्य आले आहे. यावेळी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सचिन पायलट यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना येत्या निवडणुकीत भाजपला जास्त जागा जिंकता येणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे. ‘जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात. भाजपच्या ४०० चा आकडा पार केल्याच्या दाव्याबाबत ते पुढे म्हणाले की, याआधी काँग्रेसचा पराभव झाला की 20-21 जागा किंवा 50-55 जागा मिळत होत्या, मात्र यावेळी 70 जागा मिळाल्या आहेत. यावरून काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.