Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं काय होणार? योगिचं सांगलीत मोठं भाकीत

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं काय होणार? योगिचं सांगलीत मोठं भाकीत 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपच्या प्रचारासाठी सांगलीत आहेत. सांगली येथील जाहीर सभेतून काँग्रेसवर सडकून टीका केली. 2014 पूर्वी देश सुरक्षित नव्हता. परंतु, मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाची सीमा सुरक्षित झालीय. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झालाय, भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही, इतकी दहशत भारताची त्यांच्यामध्ये बसली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचं काय होणार याचं भाकितही योगींनी सांगितलं आहे.


मुख्यमंत्री योगी म्हणाले, शूरवीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख आहे. या भूमीला मी वंदन करतो. महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात उजाळा दिला. सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. पण, 2014 नंतर देशात परिस्थिती बदलली आहे. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवत आहे. जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी पहिला देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात, असा आरोप योगींना लावला.

काँग्रेसने 65 वर्ष सत्ता भोगली. अयोध्येत राम मंदिर का बांधले नाही? सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या. मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक महामार्ग बांधले. आज देशात दुप्पट हायवे झालेले आहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आज 20 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. आम्ही छेडणार नाही आणि सोडणारही नाही. राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाट वाहतील असे विरोधक बोलत होते. मात्र राम मंदिराच्या उभारणीमुळे एक मच्छर देखील मरणार नाही, हा विश्वास देतो. निवडणूक झाली की काँग्रेस इतिहास बनून राहील, असं भाकित यावेळी योगींनी वर्तवलं.

आमच्या इकडे युपीमध्ये हिंमत नाही इलेक्शन लढण्यासाठी. तेथे दोन उमेदवार दिले आहेत. काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलतंय, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस एक इतिहासजमा वस्तू होईल अशी त्यांनी भीती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखतेय. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर काँग्रेस जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल, असा आरोप योगींनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.