Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिरुपती दर्शन, वेळ आणि संपूर्ण बुकींग कशी आहे प्रोसेस :, जाणून घ्या

तिरुपती दर्शन, वेळ आणि संपूर्ण बुकींग कशी आहे प्रोसेस :, जाणून घ्या 


आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचं मंदित हे जगातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. एवढंच नाही तर ते भारतातील श्रीमंत मंदिर देखील आहे. या मंदिरात सर्वात जास्त सोनं, पैसे, चांदी अर्पण केली जाते. असे म्हणतात की हे एक चमत्कारी मंदिर आहे. इथे लोकांच्या इच्छा पूर्ण होतात. ज्यामुळे लोक देवाला गोष्टी दान करत असतात.


वेंकटेश्वर स्वामी हे या मंदिराचे मुख्य देवता आहेत, ज्यांना भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. अनेक लोकांना या देवाचं दर्शन घ्यायचं असतं, पण इथे कसं जावं किंवा दर्शनाची वेळ काय? हे अनेकांना माहित नसतं. ज्यामुळे अनेकांची गैरसोय होते. जर तुम्ही तिरुपती बालाजी मंदिरात जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला बुकिंग प्रक्रिया, वेळ आणि तिकिटाच्या किंमतीशी संबंधित गोष्टी सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तिरुपती बालाजी मंदिर ब्रह्मोत्सवासारख्या काही विशेष प्रसंगी वगळता वर्षभर दर्शनासाठी खुले असते. तथापि, वेळ भिन्न असू शकते.

सकाळी 3:00 ते दुपारी 1:30 आणि नंतर दुपारी 2:30 ते रात्री 9:30 पर्यंत सामान्य दर्शनाची वेळ असते. परंतू मंदिर शुक्रवार आणि शनिवारी 24 तास खुले असते. कृपया लक्षात घ्या की मंदिराच्या आत होणाऱ्या वेगवेगळ्या विधींमुळे वेळ बदलू शकते.

तिकिटाची किंमत

तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शनासाठी तिकीट दर तुमच्या दर्शनाच्या प्रकारानुसार बदलतात. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मंदिरातील व्हीआयपी दर्शनासाठी 300 रुपये मोजावे लागतील. तर तुम्हाला 50 रुपयांमध्ये सामान्य तिकीट मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.