कथित लैगिंक गुन्ह्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा हा फरार आहे. याप्रकरणी देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या प्रकरणी सर्वांविरोधात कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले आहेत. यात आणखी काही लोकांना समावेश असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. एचडी देवेगौडा यांनी ९१ व्या वाढदिवशी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कारवाई करायला हवी. मी कोणाची नावं घेणार नाही.' हासनचा खासदार प्रज्वल रेवण्णा हा जर्मनीमध्ये असल्याचं सांगितलं जातं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.