वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. यादिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शास्त्रातील तिथीला ईश्वरीय तिथी सांगितले गेले आहे. या दिवशी केलेल्या पुण्याच्या कामाचे फळ कधीही संपत नाही, असे सांगितले जाते. तसेच यादिवशी भगवान विष्णुचे अवतार परशुराम यांचीही जयंती साजरी केली जाते.
काशी हिंदू विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्राध्यापक सुभाष पांडेय यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या दिनाला काही वस्तू दान केल्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, यादिवशी गंगा स्नान आणि दान केल्याने फक्त अक्षय पुण्य फळाची प्राप्तीच होत नाही. तर यासोबतच तुमचे नशिबही उजळते.
भगवान विष्णुची होणार विशेष कृपा -
अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर गंगा स्नान करायला हवे. गंगा स्नान केल्यावर जल कुंभ दान म्हणजे मातीच्या मडक्यात पाणी भरुन ब्राह्मणाला त्याचे दान करावे. यासोबतच पंखा दान करण्याचेही यादिवशी सांगितले गेले आहे. अन्नदानही करायला हवे. जो व्यक्ती या तीन वस्तूंचे दान करतो, त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते.यासोबतच या दिवशी भगवान विष्णुचे अवतार परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विष्णूची पूजा आणि आराधना करायला हवी. याशिवाय भगवान विष्णूच्या मंत्राचा जपही करायला हवा. यादिवशी गुप्तदानाचे विशेष असे महत्त्व आहे. गुप्त दान फळाच्या आत मौल्यवान रत्न किंवा धातू (सोने) दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि नशिबाचे बंद दरवाजेही उघडतात, असेही त्यांनी सांगितले.
सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत 'सांगली दर्पण 'कोणताही दावा करत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.