Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार मित्राचा प्रचार करणं अल्लू अर्जुनला पडलं महागात

आमदार मित्राचा प्रचार करणं अल्लू अर्जुनला पडलं महागात


भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनविषयी एक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खरंतर देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सगळीकडे जोरदार प्रचारसभा चालू आहेत. अशातच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशातच अभिनेता अल्लू अर्जुनचे मित्र आणि वायएसआरसीपीचे आमदार शिल्पा रवी नानघल मतदारसंघातून उमेदवार उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत शनिवारी 11 मे रोजी, अभिनेता आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्या मित्राला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी या आमदाराच्या घराबाहेर चाहत्यांची तौबा गर्दी झाली.

सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची मौठी गर्दी जमली होती आणि ते 'पुष्पा, पुष्पा' असा जयघोष करत होते. अभिनेत्याने पत्नी स्नेहा रेड्डीसह बाल्क‌नीतून लोकांना अभिवादन केलं. यावेळी अभिनेत्यासोबत शिल्पा रवी आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी आमदाराच्या घराबाहेर मोठी गर्दी झाली होती. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. गर्दीवर नियंत्रण ठेवणं पोलिसांना अशक्य झालं. आंध्र प्रदेशात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत आमदाराच्या घराबाहेर अभिनेत्यासाठी गर्दी जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कडक कारवाई केली. याच प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे, यामुळं परवानगीशिवाय गर्दी जमवण्यास कोणालाही परवानगी नाही. त्यामुळेच अल्लू अर्जुनविरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यार्त आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.