सांगली दि : 4 परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ( RTO ) सांगली यांना नुकतीच 5 इंटरसेप्टर वाहने प्राप्त झाली आहेत . या वाहनांद्वारे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वेग व विना हेल्मेटधारक वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने जाणारी वाहने तसेच दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेट परिधान न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल .
जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी आपले वाहन वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालू नये तसेच दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट प्रदान करावे तसे नाही केल्यास संबंधिताविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.