Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांची रक्कम ज्या ज्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी हडप केली त्यांना चाबकाने फोडा.:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

शेतकऱ्यांची रक्कम ज्या ज्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी हडप केली त्यांना चाबकाने फोडा.:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील. 


दलाल, व्यापारी,मध्यस्थी,निकृष्ट बियाणे, ओला दुष्काळ, वाळला दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, सुसाट वारे, अवकाळी पाऊस, दर गड गडला, महापुर, दलालांनी फसवणूक केली, मार्केट ढासळने, दमट हवामान ,उष्ण हवामान, हवामानाचा अंदाज नाही, अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न,यातूनही आलेल्या पिकाला हमीभाव नाही, त्यामुळे नवीन पिढी शेतीकडे वळत नाही व जुनी पिढी शेतीतून पाहिजे तसे पीक किंवा उत्पादन न मिळाल्यामुळे आत्महत्या कडे वळू लागले आहे. यातच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय त्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या पंचनामा मुळे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम मंजूर झाली आहे. ज्यामुळे त्याचा झालेला खर्च काही अंशी मिळाल्याचा आनंद वाटतो, परंतु त्या मदतीवरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनेक  शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनी संगणमत करून नुकसान भरपाईची रक्कम परस्पर हडप केले आहे असे दिसून आले आहे. 

आधीच पिकाला हमीभाव नाही सावकारी कर्ज, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, घरातील संसार, दवाखाना विविध कार्यक्रम यावर कर्ज काढून कर्जबाजारी झालेला शेतकरी यांना जीवन नकोसे झाले आहे.  सरकारकडून काही मदत आहे ती ही या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने गायब केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे नवीनच संकट शेतकऱ्याच्या समोर आले आहे. म्हणून आम्ही चर्चा करण्यासाठी काही बँकेतील अधिकाऱ्यांना भेटून ज्या ठिकाणी प्रकरण घडलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सांगितले आहे.ज्या भागात हे प्रकरण घडले आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना याद्वारे आव्हान आहे की ज्या बँकेत हे प्रकरण घडले आहे त्या बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी चापकाने फोडावे असे आव्हान मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये शेतकऱ्यांना आव्हान केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.