भाजपा 400 जागा जिंकली तर पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आधी चीनच्या ताब्यातील चार हजार किलोमीटरची जमीन मिळवा मग पीओकेच्या बाता करा, अशा शब्दांत सिब्बल यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.
पीओके भारताचा भाग होता आणि तो आम्ही घेणारच, असे सांगत अमित शहा फिरत आहेत. कोलकात्याच्या एका सभेत त्यांनी बुधवारी याबाबत भाष्य केले होते. तर अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाबद्दलही अमित शहा यांनी टिपण्णी केली होती. अनेक लोपं म्हणतात की, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन देण्यासोबतच विशेष सवलत दिली जात आहे, मात्र अमित शहा यांना कायद्याबद्दल जास्त माहीत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अमित शहा यांनी याबद्दल बोलणे अत्यंत चुकीचे आहे, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.