रायबरेलीत राहुल गांधी… अशा गजरात प्रचार सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचानक लालगंजमधील ब्रजेंद्र नगर येथील छोटय़ाशा न्यू मुंबा देवी हेअर कटिंग सलूनकडे मोर्चा वळवला. निवडणूक महत्त्वाची आहेच पण माझी वाढलेली दाढी, केस कापणेही गरजेचे आहे, म्हणत त्यांनी सलूनचालक मिथुनच्या खुर्चीत बैठक मारली.
देखो भय्या, थोडा धीरे से… म्हणत आपल्या दुकानातील खुर्चीत खरोखरच राहुल गांधी बसले आहेत यावर त्याचा काही काळ विश्वासच बसेना. पण सर्वसामान्यांमध्ये सहजतेने मिसळणाऱया राहुल यांनी थोडय़ाच वेळात मिथुनलाही गप्पांमध्ये गुंतवून टाकलं.. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनीही 'एक्स'वर मिथुनच्या दुकानातील हा व्हिडीओ शेअर केला आहे. अशाच कुशल तरुणांच्या हक्कांसाठी आम्ही लढत आहोत आणि देशाच्या विकासात त्यांचा सहभाग हवा अशी मागणी करत आहोत, असे या पोस्टमध्ये राहुल यांनी म्हटले आहे.
भावीपंतप्रधानआणिटॉफी
लालगंजमधील सभा आटोपून निघालेल्या राहुल गांधी यांनी मिथुनचे सलून पाहिल्यावर गाडी थांबवली. ते सलूनमध्ये शिरले तेव्हा मिथुन आणि त्यांचे दोन कारागीर उपस्थित होते. दाढी आणि हेअरकट झाल्यावर राहुल यांनी मिथुन आणि त्याच्या कारागिरांसोबत ग्रुप पह्टोही काढला. सलूनबाहेर त्यांची वाट पाहणाऱया काही तरुणांनी त्यांना भावी पंतप्रधान अशी हाक मारल्यावर ते काहीच बोलले नाहीत, मात्र खिशातून टॉफी काढून त्या तरुणाला दिली.
लाईट गेली तरीही राहुल आरामात होते…
राहुल गांधी अचानक दुकानात आले. एवढा मोठा नेता समोर पाहून मला धक्काच बसला. त्यांनी माझे नाव विचारले आणि सांगितले की त्यांना दाढी आणि केस कापायचे आहेत. मी कटिंग सुरू केली आणि लाईट गेली. तरीही ते आरामात होते. त्यांनी माझ्या उत्पन्नाबद्दलही विचारले. पण मत देण्याविषयी ते काहीच बोलले नाहीत, असे मिथुन याने सांगितले. यासाठी किती पैसे दिले असे विचारले असता मिथुनने हसून हा प्रश्न टाळला. हे गुपितच राहू दे, असे त्याने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.