Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आईला शिव्या देणं जीवावर बेतलं :, मित्रांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

आईला शिव्या देणं जीवावर बेतलं :, मित्रांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 


सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घटनेनं खळबळ उडाली आहे. दारू पिऊन आईला शिव्या देतो म्हणून मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातील बाळे गावात घडली आहे. लखन गायकवाड असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर नागेश कोळेकर आणि आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर असं मारहाण केलेल्या मित्रांची नावं आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लखन गायकवाड हा त्यांचा मित्र नागेश कोळेकर याच्या टेम्पोवर क्लीनर होता. लखन हा दारू पिण्यासाठी आपली आई अलका गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यानं त्याने आपल्या आईला शिवीगाळ केली. तो आईला शिव्या देत असल्याच पाहून नागेश आणि आशितोष यांनी लखनची समजूत काढली. आईला शिव्या देऊन नको असं त्यांनी त्याला सांगितलं.

मात्र तरीही शिवीगाळ करत असल्यामुळे नागेश आणि आशुतोष या दोन्ही मित्रांनी लखन याला लाकडी दांडक्यानं आणि पाईपनं मारहाण केली. दोघांनी केलेल्या मारहाणीत लखन गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लखनला मारहाण करताना त्याच्या आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मार वर्मी लागल्यानं त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी नागेश आणि आशुतोष यांना अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.