सांगली : शहरातील संजयनगर परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे असा पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती संजयनगरचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली.
ऋषिकेश दशरथ शिंदे (वय २२, रा. पाटणे प्लॅट, संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्य शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक कुरळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार शाखेचे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
संजयनगर येथील बस स्टॉपजवळ एक तरूण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली. पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याजवळ शस्त्र सापडल्याने त्याला अटक करून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, संजयनगरचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाने दीपक गायकवाड, कपील साळुंखे, आकाश गायकवाड, माणिक सावंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.