Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' माझ्या आईवर बलात्कार केला अन.. व्हिडिओ कॉलवर मला.... पीडितेने सांगितली आपबीती

' माझ्या आईवर बलात्कार केला अन.. व्हिडिओ कॉलवर मला.... पीडितेने सांगितली आपबीती 


कर्नाटकातील चर्चेत आलेले सेक्स स्कँडल प्रकरणातील पीडितेने पुढे येऊन जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने सांगितले की, प्रज्वलने चार ते पाच वर्षांपूर्वी तिच्या बेंगळुरू येथील राहत्या घरी तिच्या आईवर बलात्कार केला होता.


त्याचबरोबर पिडीतेचेही लैंगिक शोषण केले आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. घटनांचा संदर्भ देत त्यांनी आरोपी प्रज्वल याच्याविरुद्ध सविस्तर जबाब नोंदवला आहे.

2020 ते 2021 दरम्यान प्रज्वल रेवण्णाने तिला व्हिडिओ कॉलला उत्तरे देण्यास भाग पाडले, असा आरोपही पीडितेने केला आहे. तसेच तिला आणि तिच्या आईला धमकावून व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढण्यास भाग पाडण्यात आल्याचेही तिने सांगितले आहे. याशिवाय प्रज्वलचे वडील एचडी रेवन्ना यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, पीडितेने एसआयटीला सांगितले की, "तो (प्रज्वल) मला फोन करायचा आणि फोनवरून कपडे काढायला सांगायचा. तो पीडितेच्या आईच्या मोबाइलवर कॉल करायचा आणि व्हिडिओ कॉल उचलायला भाग पाडायचा. जेव्हा त्याला पिडीतेने आणि तिच्या आईने हे करण्यासाठी नकार दिला. तेव्हा त्याने पुन्हा दोघींना धमकवायला सुरूवात केली. या संपुर्ण प्रकरणाबाबत जेव्हा पिडीतेच्या कुटुंबाला समजले तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला आणि मग पिडीतेने तक्रार दाखल केली.

'लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ बनवल्याची माहिती नव्हती'

या छळाबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. माझ्या आईवर प्रज्वलने त्याच्या बसवानगुडी, बेंगळुरू येथील राहत्या घरी बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ बनवला आहे की नाही हे आम्हाला माहीत नव्हते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आम्ही स्वतः तो पाहिला नसला तरी पोलिसांनी तो आम्हाला दाखवला आणि त्यात प्रज्वलचा चेहरा दिसत आहे.

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, "एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना यांनी माझ्या आईवर बलात्कार केला आणि अत्याचार केले. प्रज्वलने माझे देखील लैंगिक शोषण केले. प्रज्वल माझ्या आईला धमकी द्यायचा की, जर तिने सहकार्य केले नाही, तर तो तिच्या नवऱ्याला(माझ्या वडीलांना) मारून टाकेल. वडिलांची नोकरी घालवेल, त्यांना बेरोजगार करेल आणि माझ्यावर बलात्कारही करेल."

पीडितेने पुढे सांगितले की, 2020 आणि 2021 दरम्यान सतत होणाऱ्या छळाचा तिच्या कुटुंबावर मोठा परिणाम झाला. यामुळे त्यांना फोन नंबर देखील बदलावा लागला. हसन मतदारसंघाचा खासदार प्रज्वल हा आपल्या निवासस्थानी महिला नोकरांचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोपही मुलीने केला आहे.

'रेवन्ना नोकरांचा लैंगिक छळ करायचा'

मुलीने दावा केला आहे की, "रेवन्ना महिला नोकरांना आमिष दाखवून त्यांचा लैंगिक छळ करत असे. त्याने माझ्या आईवरही बलात्कार केला. आतापर्यंत केवळ तीन जणांनी या घटनांबद्दल समोर येऊन जाहीरपणे बोलले आहे. इतर तीन नोकरांनीही सांगितले नाही."

'आई चार-पाच महिन्यातून एकदा घरी यायची'

या घटनेच्या दोन वर्षांनंतर तिला तिची जमीन विकण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावाही मुलीने केला आहे. मुलीने आरोप केला की, "आम्ही नातेवाईक असूनही, त्याने माझ्या आईचा एवढा छळ केला की ती (माझी आई) चार-पाच महिन्यातून एकदाच घरी यायची. तिचा इतका छळ केला जायचा की ती आम्हाला रात्री उशिरा फोन करायची. फक्त 1 किंवा 2 वाजता फोन करायचो. त्याने माझ्या आईला गुलामासारखे वागवले आणि माझ्या वडिलांना मारहाण केली. त्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला आहे."

पीडितेने केली न्यायाची मागणी

पीडितेने प्रज्वल रेवन्ना आणि एचडी रेवन्ना यांचे "सवयीचे गुन्हेगार" म्हणून वर्णन केले आणि तिच्या आईसाठी आणि स्वतःसाठी न्याय मागितला आहे. आता आम्ही त्याचा पर्दाफाश केल्याने आमच्यावर नोकऱ्या देणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याचे तरुणीने सांगितले. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला काही झाले तर त्याला आरोपीचे कुटुंब जबाबदार असेल. गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याने बसवनगुरी आणि होलेनारसीपुरा या दोन्ही निवासस्थानी सर्व काही बदलले. त्याने सर्व पुरावे जाळून टाकले आणि आपल्या दोन्ही घरांचा संपूर्ण सेटअप बदलला.

पीडितेने पुढे सांगितले की, आम्ही घाबरलो होतो, त्यामुळेच सुरुवातीला लैंगिक छळ झाल्याचे वक्तव्य केले. जेव्हा माझ्या आईने बलात्काराचा व्हिडिओ पाहिला तेव्हा तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचे मान्य केले. तिने न्यायाधीश आणि एसपी यांच्यासमोर बलात्कार झाल्याचे निवेदन दिले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी घटनास्थळी नेण्यात आले. आता तो खटला मागे घेतल्यास आमचे घर परत करू, अशी ऑफर देत आहे. आम्हाला न्याय हवा आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. वडील आणि मुलगा दोघेही गुन्हेगार आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना ते काम करत असलेल्या डेअरीतून काढून टाकले आहे. कृपया आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करा.

आरोपी वडील तुरुंगात असून मुलगा अद्याप फरार

33 वर्षीय जेडीएस खासदार आणि त्यांच्या वडिलांवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधक भाजप आणि मित्रपक्ष जेडीएसवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने इतर पीडितांसाठी पुढे येऊन तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यात दोन बलात्कार आणि एका अपहरणाचा समावेश आहे.

एचडी रेवन्ना यांना १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 27 एप्रिल रोजी तो परदेशात पळून गेल्याचा आरोप आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.