Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर! पत्नी बरोबर फोनवर बोलत होता, आई मध्येच बोलली :, संतापलेल्या मुलाने आईलाच संपवलं

कोल्हापूर! पत्नी बरोबर फोनवर बोलत होता, आई मध्येच बोलली :, संतापलेल्या मुलाने आईलाच संपवलं 


राग… माणसाचा सर्वात मोठा शत्रू ! एखाद्याला राग आला आणि तो डोक्यात गेला तर ती व्यक्ती काय करेल याचा काहीच नेम नाही. अशा वेळी रागाच्या भरात अशी कृती होऊन बसते की आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

अशाच रागामुळे एका मुलाने त्याच्या आईसोबत असे काही कृत्य केले ज्यामुळे एक जीव हकनाक गेला आणि त्याचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. रागातून मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्राकर कोल्हापूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलल्याचा मुलाला रागा आला आणि त्याने त्याच्या आईचाच जीव घेतला. या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकत अटक केली.


कौटुंबिक वादातून आईलाच संपवलं

मुलगा आईच्या जीवावर उठल्याची ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे घडली. कौटुंबिक वादातून मुलाने आईचा जीव घेतला. सादिक मुजावर असे आरोपीचे नाव असून शहनाज मुजावर असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सादिक हा त्याच्या पत्नीसोबत फोनवर बोलत होता. तेवढ्यात त्याची आई, शहनाज ही मध्येच काहीतरी बोलली. त्याचा सादिकला राग आला आणि भांडण झालं. रागाच्या भरात त्याने त्याच्या आईवर हल्ला केला. तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या शहनाज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित त्यांना केले. या हत्याकांडाची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपी सादिक याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.