Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्यात 94 टँकरनें पाणी पुरवठा

सांगली जिल्यात 94 टँकरनें पाणी पुरवठा 


सांगली जिल्ह्यात तापमानाचा पारा चढत आहे, तशा टंचाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. मे महिन्याच्या तोंडावर जिल्ह्यात एक लाख ९१ हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ टँकर सुरू आहेत. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ७९ गावे, ५९९ वाड्यांना हा पाणीपुरवठा सुरू आहे. कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांतही १० गावे टंचाईग्रस्त आहेत. मात्र, तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही.

जिल्ह्यात गत वर्षी पावसाळ्यात जुलै वगळता जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे यंदा सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचाही समावेश झाला आहे. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यानंतर टंचाईची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका जत आणि आटपाडी तालुक्यांतील गावांना बसला आहे. या तालुक्यांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी या दोन तालुक्यांतील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून ७९ गावे, ५९९ वाड्या, गावांना ९४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टंचाईग्रस्त गावे वाढली

यंदा पाऊस सरासरीहून ३२ टक्के कमी झाला. त्यामुळे डिसेंबरमध्येच ४१ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. ही संख्या गेल्या चार महिन्यांत ५० ने वाढली आहे. पावसाळ्यास अद्याप दीड महिना बाकी आहे, तोपर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढणार, हे स्पष्ट आहे.

जतमध्ये ७४ गावे टंचाईग्रस्त

आजमितीस जत तालुक्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यातील ७१ गावे आणि ५२० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील एक लाख ७० हजार ४०९ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जत तालुक्यात महिनाभरात बाधित लोकसंख्या सहा हजारांनी वाढली आहे. आटपाडी तालुक्यातील नऊ गावे आणि ७९ वाड्यांना टंचाईची झळ बसली आहे. त्यातील आठ गावांना आणि ७९ वाड्यांना १० टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

या तालुक्यातील २० हजार ४०८ लोकसंख्या टंचाईने बाधित आहे. जत तालुक्यात ८४, तर आटपाडी तालुक्यात १० टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच खानापूर तालुक्यातील चार, तासगाव तालुक्यातील पाच आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एक गाव टंचाईग्रस्त आहे. मात्र, या दहा गावांना अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही.

जिल्ह्यातील टंचाईवर दृष्टिक्षेप

एकूण टँकर ९४

तालुके २

गावे ७९

वाड्या ५९९

नागरिक १ लाख ९१ हजार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.