एवढ्या कडक उन्हात 7 टप्प्यात निवडणुकीची गरज काय? ममता बॅनर्जीचा सवाल
देशभरात कडक उन्हाळा असून अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. अनेक शहरांची भट्टी झाली आहे. असे असताना इतक्या सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची काय गरज होती, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
पश्चिम बंगालमध्येही भयानक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मी स्वतः महिनाभरापासून घरापासून दूर आहे. आणखी एक महिना जायचा आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान संपले असून आता 7 मे रोजी तिसऱया टप्प्यातील मतदान होणार आहे. मालदा येथे तब्बल 44 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.