Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! नवीमुंबईमध्ये आईने 6 वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खाजगी व्हिडिओ

धक्कादायक! नवीमुंबईमध्ये आईने 6 वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खाजगी व्हिडिओ


सहा वर्षाच्या मुलाला खासगी व्हिडिओ शूट करण्यास सांगितल्याप्रकरणी उरण पोलिसांनी २५ वर्षीय महिला आणि तिच्या ३५ वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने पोलिसांना तसे निर्देश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. खटल्यादरम्यान पुरावा म्हणून व्हिडीओ न्यायालयात सादर करण्यात आला. हा व्हिडीओ तिसऱ्या व्यक्तीने शूट केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याबाबत महिलेला विचारले असता हा व्हिडिओ तिच्या मुलाने शूट केला असल्याचं तिने सांगितलं. चौकशी केली असता, मुलाने सांगितले की, त्याने त्याच्या ‘काकांच्या’ (सहआरोपी) सांगण्यावरून असे केले होते."

“एका अल्पवयीन मुलाने दोन अश्लील व्हिडीओ काढल्याचे कळताच न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले, त्यानंतर उरण पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला”, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या मुलाला जवळपास सहा महिन्यांपूर्वी सोडून दिले होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्को कायदा आहे काय?

प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ तयार करण्यात आला. या कायद्यानुसार किमान शिक्षा दहा वर्षे तर कमाल जन्मठेपेची (प्रसंगी फाशी) तरतूद करण्यात आली आहे .या कायद्यात जामीन मिळणेही मुश्किल आहे. शिवाय जलदगती न्यायालयात खटला चालविला जात असल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊन या कायद्याची जरब निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.