Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी झोपेच्या गोळ्या दिल्या अन.. नंतर 6 अल्पवयीन मुलांनी मौलवीला संपवले

आधी झोपेच्या गोळ्या दिल्या अन.. नंतर 6 अल्पवयीन मुलांनी मौलवीला संपवले 


राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील रामगंज भागात एका मशिदीच्या मौलवीच्या हत्येप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्त घेण्यात आले आहे. यावेळी मुलांनी सांगितले की, मौलवीने त्यांचे लैंगिक शोषण केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मोहम्मद ताहीर (30) याची 26 एप्रिलच्या रात्री बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती.


पोलिस अधीक्षक (अजमेर) देवेंद्र विश्नोई म्हणाले की, मशिदीत त्याच्यासोबत राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांची चौकशी राहिल्यामुळे तपास रखडला होता. मौलवी त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याने त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी ताहिरच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि नंतर त्याला काठीने मारहाण केली. नंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, मास्क घातलेले तीन पुरुष मशिदीत घुसले आणि मौलवीवर हल्ला केला.

अजमेर पोलिसांच्या विशेष पथकासाठी हे प्रकरण

एक आव्हान होते कारण शेकडो सीसीटीव्ही अजमेर पोलिसांच्या विशेष पथकासाठी हे प्रकरण एक आव्हान होते कारण शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणि उत्तर प्रदेशातील ताहिरची 8 वर्षांची पार्श्वभूमी तपासल्यानंतरही या प्रकरणात काहीही निष्पन्न होत नव्हते. परंतु, आम्ही विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले त्यानंतर मुलांनी सर्व घटनाक्रम उघड केला, असे पोलीस अधिक्षक विश्नोई म्हणाले. बिश्नोई म्हणाले, मदरशातील एका विद्यार्थिनीचे ताहिरने लैंगिक शोषण केले होते. जेव्हा विद्यार्थाने हा प्रकरा उघड करण्याची धमकी दिली तेव्हा ताहिरने त्याला पैशाचे आमिष दाखवले.

पुढे ताहिरच्या सततच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्यांनी माहिरचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला पहिल्यांदा झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर काठीने बेदम मारहाण केली आणि दोरीने गळा आवळून खून केला, असे त्याने सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.