Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रक्ताच्या नमुना घेण्यासाठी 6 तास, नंतर पिझ्झा खाऊ घेतला, अमितेश कुमारांची बदली करा :, माजी IAS अधिकाऱ्यांनी केली मागणी

रक्ताच्या नमुना घेण्यासाठी 6 तास, नंतर पिझ्झा खाऊ घेतला, अमितेश कुमारांची बदली करा :, माजी IAS अधिकाऱ्यांनी केली मागणी 


पुणे : 19 मे रोजी पोर्श दुर्घटनेप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी एका माजी IAS अधिकारी यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. पोर्श दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. माजी आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि या पत्राद्वारे त्यांनी पत्राद्वारे बदली करण्याची मागणी केली आहे. 

मी या प्रकरणात तुमचा (मानवी हक्क आयोगाचा) हस्तक्षेप मागतो कारण या प्रकरणाने आम्हाला हादरवून टाकले आहे आणि आमची असुरक्षितता वाढविली आहे आणि आम्हाला आमच्या प्रशासनाचा आणि लोकशाहीचा भयानक चेहरा दाखवला आहे. भ्रष्ट अधिकारी आणि त्रस्त नागरिक आता दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. भाटिया यांनी हे पत्र पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकायुक्त, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे. भाटिया यांनी पुणे पोलिस आयुक्तांना अपयशी पोलीस आयुक्तदेखील म्हटलं आहे. 
पुण्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या (ससून) मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी संगनमत करून एका गुन्हेगाराला वाचवले, असा दावा निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनी केला आहे. आरोपीने मद्यपान केले की नाही हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने पाठविण्यास पोलिसांना सहा तासांहून अधिक वेळ लागला. इतकंच नाही तर रक्त तपासणीपूर्वी पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा खायला दिला, मग डॉक्टरांनी सॅम्पल नष्ट केला, असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. 

पोलिस आयुक्त हे शहरातील पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी त्यांची तातडीने पुण्याबाहेर बदली करून त्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाटिया यांनी केली. एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे झाल्याने राज्याने राजकारण तापले आहे. 19 मे च्या रात्री भीषण अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यात पोलिसांसह डॉक्टरांचे कारनामे बाहेर आले आहेत. त्यामुळे थेट आयुक्तांची बदली व्हावी, अशी मागणी केली आहे. 
पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते धिम्या गतीने तपास करत असल्याचा आरोप त्यांच्यावर विविध स्तरावरुन होत आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकरांनीदेखील अमितेश कुमार यांना निलंबित कऱण्याची मागणी केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.