धारावीत भीषण आग!! 6 लोक गंभीर जखमी; अग्निशामकच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल
धारावीतील अशोक नील कंपाउंडर रोल कला येथे ही घटना घडलेली आहे. जमिनीपासून गोदामाच्या तिसऱ्या मजल्यांपर्यंत ही आग पोचलेली आहे. या इमारतीमध्ये लाकडी साहित्य तसेच फर्निचर देखील होते. ते देखील जळलेले आहे. धारावीत अशोक नीलकंपाऊंडमध्ये कमर्शियल गारमेंट जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली आहे.
धारावीत लागलेल्या गोदामाची आग विझवण्यासाठी अग्निशमन दल हे पहाटेपासून बचाव काम करत आहे. त्याचप्रमाणे सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा देखील प्रयत्न आजकाल मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. या आहीमध्ये एकूण सहा जण होरपळले आहेत. त्यांना या आगीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आहे. या लोकांवर लगेच उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही उपचार करून काहींना उपचार करून घरी देखील सोडण्यात आल्याची माहिती आलेली आहे. परंतु ही आग का लागली याची माहिती अजून समोर आलेली नाही.
या आगीत एकूण सहा जण भाजले आहेत. यातील सलमान खान वय 26 वर्ष हे 8 ते 10 टक्के भाजलेले आहे. त्याचप्रमाणे मनोज वय 26 वर्ष हे देखील आठ ते दहा टक्के भाजलेले आहे. अहमद वय 22 वर्षे हे 40 ते 50 टक्के भाजलेल्याची माहिती मिळालेली आहे. सलाउद्दीन वय 40 वर्ष हे 40 ते 50 टक्के भाजलेले आहे. सदुल रहमान वय वर्ष 26 हे 30 ते 40 टक्के भाजलेले आहेत. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती मिळालेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.