छत्रपती संभाजीनगर: भिशीचे पैसे न दिल्याच्या कारणावरून महिलेसह ५ लहान मुलांचे अपहरण भिशी चालवत असलेल्या महिलेने भिशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तिच्यासह पाच लहान मुलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बिडकिन येथे घडला.
याप्रकरणी पोलिसांनी जावेद कलीम शेख,गंगाराम शेका राठोड, अस्लम युनुस पठाण,फातिमा शेख (पूर्ण नाव माहीत नाही),शबाना (पूर्ण नाव माहिती नाही), सीमा (पूर्ण नाव माहिती नाही), शिल्पा (पूर्ण नाव माहीत नाही), महाराज (नाव माहिती नाही) आणि अन्य 3 ते 4 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुमताज अहमद शेख (वय ३८ वर्ष) या भिशी चालवतात. त्यांनी भिशी तसेच व्याजाचे पैसे न दिल्याने आरोपींनी सोमवारी संध्याकाळी मुमताज यांच्यासह पाच लहान मुलांचे अपहरण केले. या सर्वांना अंबरहिल येथे डांबून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे,अशोक माने यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिला व लहान मुलांची सुखरुप सुटका केली.
याप्रकरणी बिडकिन पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. सहायक फौजदार सोमनाथ तांगडे, हेड कॉन्स्टेबल दिलीप साळवे, योगेश नाडे, पोलिस कर्मचारी वाघमोडे, बनकर, महिला पोलिस कर्मचारी रंजना राठोड आदींचा या तपास पथकात समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.