ठाणे : गेल्या अनेक दिवसापासून ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यावर आता शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीतच नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून चांगलाच गदारोळ उठला आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जवळपास ५४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेतून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीकडून उमेदवार घोषीत होत नव्हता. अखेर ठाण्याची जागा ही शिंदेंना देण्यात आली असून त्याठिकाणी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र म्हस्के यांच्या उमेदवारीच्या विरोधात नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आता हे सर्वच पदाधिकारी राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.तर नवी मुंबईतील भाजपच्या बैठकीतून नरेश म्हस्के यांनी काढता पाय घेतला आहे. आम्ही शिवसेनेला मदत करणार नाही. अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपकडून संजीव नाईक ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यांना महायुतीकडून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.