Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी?

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. येथे काळा पैसा प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनि लॉंडरिंग अॅक्ट अर्थात पीएमएलएअंतर्गत सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने ही कारवाई निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणावर टाकली आहे.

मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडल्या नोटा

झारखंडमधील सेल सिटीसहीत अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलम गिर यांचे स्वीकिय सचिव असलेल्या संजीव लाल यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरच्या घरात बँगांमध्ये भरुन ठेवलेले नोटांचे बंडल सापडले आहेत. आता या प्रकरणामध्ये अधिक सखोल तपास केला जात आहे.

बॅगांमध्ये 500-500 च्या नोटांचे बंडल

ईडीच्या अधिकाऱ्यांनी या नोकऱ्याच्या घरावर छापा मारला तेव्हा त्याच्या घरात आढळून आलेल्या अनेक छोट्या-मोठ्या आकारांच्या बॅगांमध्ये 500-500 च्या नोटांचे बंडल भरुन ठेवण्यात आल्याचं उघड झालं. तपास अधिकाऱ्यांनी एक एक करुन या सर्व बॅगा घरातच रिकाम्या केल्या. त्यानंतर या ठिकाणी सापडलेल्या पैशांची संख्या पाहता नोटा मोजणारी मशिन आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं असून सध्या नोटा मोजण्याचं काम सुरु आहे.

किती आहे ही रक्कम?

ईडीने व्यक्त केलेल्या शंकेनुसार हा सारा काळ्या कमाईमधून कमावलेला पैसा असून हा पैसा या नोकराच्या घरी कुठून आला? त्याला एवढ्या मोठ्याप्रमाणात कॅश संभाळण्यासाठी कोणी दिली? या प्रकरणामधील खरा सुत्रधार कोण आहे? या साऱ्या गोष्टींचा आता ईडीकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणात मंत्र्याच्या पीएलच्या नोकरला तब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम 25 कोटींच्या आसपास असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नोटांची मोजणी पूर्ण होईपर्यंत नेमका आकडा सांगता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही आठवड्यांपूर्वीच ईडीने झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. सध्या हेमंत सोरेन हे ईडीच्या ताब्यात असून अटकेआधी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.