Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' पुष्पा ' फेम अभिनेता :, गंभींर आजारानं त्रस्त :, 41 व्या वर्षी उपचार घेणंही कठीण

' पुष्पा ' फेम अभिनेता :, गंभींर आजारानं त्रस्त :, 41 व्या वर्षी उपचार घेणंही कठीण 


अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग तुफान हिट झाला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना सोबत प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाला होता. या सिनेमातला व्हिलनसुद्धा भाव खाऊन गेला होता. यात 'पुष्पा' च्या पाठीमागे लागलेल्या पोलीस ऑफिसरची भूमिका अभिनेता फहाद फासिलने साकारली होती. त्यानं साकारलेला हा पोलीस ऑफिसवर पुष्पा इतकाच हिट झाला होता. आता फाहाद विषयी एक बातमी समोर आली आहे जी चाहत्यांना चिंतेत टाकू शकते.

खरंतर, फहाद फासिल सध्या त्याच्या 'आवेशम' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. 'आवेशम'मधील फहादच्या ॲक्शन अवताराचं खूप कौतुक होत आहे. त्याचा हा सिनेमा देखील सुपरहिट झाला आहे. दरम्यान, अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित एका इव्हेंटमध्ये फहाद फाजिलने तो एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.
फहाद फाजील वयाच्या 41 व्या वर्षी 'अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर' (एडीएचडी) या आजाराने ग्रस्त आहे. एवढंच नाही तर या वयात त्याच्या आजारावर उपचार करणं देखील कठीण असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. फहाद फाजील शाळेतील मुलांना संबोधित करताना म्हणाला, 'जर तुम्ही माझ्याकडे पाहून हसत असाल तर मी तुमच्यासाठी फक्त हेच करू शकतो.'

फहादच्या या आजाराविषयी सांगायचं तर, ADHD म्हणजेच 'अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर' हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल विकार आहे, जो सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येतो. तर खूपच दुर्मिळ केसमध्ये तो प्रौढांमध्येही आढळतो. याचा दुष्परिणाम म्हणजे तुम्ही अतिक्रियाशील असता. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. यामुळे तुमचं मन सहज विचलित होतं. ADHD वर उपाय म्हणजे थेरपी आणि काही औषधांमुळे हा आजार बरा होऊ शकतो. फहादच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर तो, लवकरच 'पुष्पा 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकास खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'पुष्पा 2' 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.