मुंबई : उद्या राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी काही मतदारसंघात मतदान होत आहेत. यातच आलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यात २०१९ मध्ये जिंकलेल्या ४८ पैकी ४१ जागा यंदा कोणत्याही सर्वेक्षणातून एनडीएला मिळताना दिसत नाहीय. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी लढत असलेल्या १९ जागांवर फारशी चांगली कामगिरी करण्याची शक्यता नाही. मात्र भाजपची कामगिरी चांगली राहिल असे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात महायुतीत चिंतेचे वातावरण तयार झाले आहेत.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी भाजपने २९ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेना १९ जागा लढवत आहेत. यात मागच्या वेळी राज्यात एनडीएने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी यापेक्षा कमी जागा मिळतील असा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, राज्यात झालेल्या पक्ष फुटीचा फायदा हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे काही सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. यातच दोन्ही नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रचार सभा घेतल्या आहेत. अशातच काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे देखील चांगलेच सक्रीय झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.