Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या ' भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणानं उडवलं

'या ' भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणानं उडवलं 


पुण्यात हिट अँड रनची घटना ताजी असताना अजून एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. नोएडामध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धाला ऑडी कारने चिरडले होते. आता चक्क भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या करण सिंह यांच्या ताफ्याने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडले नेमके?
उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने तीन मुलांना चिरडले, त्यापैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. करण भूषण सिंह हे या जागेचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.