Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खान याच्या 3000 कोटी संपत्तीचा वारसदार कोण?, मोठा खुलास संपूर्ण संपत्ती.......

सलमान खान याच्या 3000 कोटी संपत्तीचा वारसदार कोण?, मोठा खुलास संपूर्ण संपत्ती.......


बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करताना दिसतो. विशेष: सलमान खान आणि त्याच्या बहिणी भावांमध्ये खूप प्रेम बघायला मिळते. सलमान खान लहान बहिण अर्पिता खान हिचे खूप लाड करताना दिसतो.

सलमान खानने अर्पिता आणि आयुष शर्माचे लग्न अत्यंत थाटामाटात केले. हेच नाही तर आयुष शर्माला बाॅलिवूडमध्ये सलमान खान यानेच लाॅन्च केले. आयुष शर्मा याने काही चित्रपटांमध्ये काम देखील केले. सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान कायमच त्याच्यासोबत असतात. सलमान खान मुंबईत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो.

सलमान खान हा 30 वर्षांपासूनही अधिक काळापासून बाॅलिवूडवर राज करताना दिसतोय. अनेक हिट चित्रपट सलमान खान याने बाॅलिवूडला दिली आहेत. सलमान खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अत्यंत आलिशान असे आयुष्य जगताना सलमान खान दिसतो. सलमान खानची संपत्ती फक्त देशातच नाही तर विदेशातही आहे.



सलमान खान हा 58 वयाचा असून त्याने अजूनही लग्न केले नाहीये. सलमान खानने अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना डेट केले. पुढे सलमान खान कोणासोबत लग्न करेल, याची शक्यता देखील कमी आहे. रिपोर्टनुसार सलमान खान हा तब्बल 3000 कोटी संपत्तीचा मालक आहे. एका चित्रपटासाठी सलमान खान 100 कोटीपेक्षा अधिक फीस घेतो. यासोबतच जाहिरातींमधूनही तो मोठा पैसा कमावतो.

सलमान खान याच्या इतक्या मोठ्या संपत्तीचा वारसदार कोण असणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. रिपोर्टनुसार, सलमान खान याच्या सर्व संपत्तीचे चार भाग केले जातील. यामध्ये त्याचे दोन भाऊ आणि दोन बहिणी याप्रमाणे. म्हणजेच सोहेल खान, अरबाज खान, अर्पिता खान आणि अलवीरा यांना ही संपत्ती मिळेल.

काही दिवसांपूर्वीच अरहान खान याच्या शोमध्ये सोहेल खान आणि अरबाज खान हे पोहचले होते. यावेळी सलमान खानच्या संपत्तीबद्दल ते बोलताना दिसले होते. सलमान खान हा मुंबईत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या घराच्याबाहेर गोळीबार करण्यात आला होता, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सध्या सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.